१९८९ पासून
यशवंतराव चव्हाण स्मारक समिती
पिंपरी-चिंचवड - यशवंतप्रेमींनी एकत्र येऊन स्थापन केलेली सामाजिक संस्था.
आमची कहाणी
सामाजिक बांधिलकीतून उभे राहिलेले स्मारक
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणांमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगधंदे, सहकारी साखर कारखाने, बँका व पतसंस्थांचे जाळे विणले गेले. हे ऋण फेडण्याचे औचित्य म्हणून त्यांचे स्मारक पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत असावे, ही भावना यशवंतप्रेमींच्या मनात होती.
याच सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन १९८९ मध्ये यशवंतप्रेमींनी एकत्र येऊन मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये "यशवंतराव चव्हाण स्मारक समिती" या सामाजिक संस्थेची स्थापना केली. १९९१ मध्ये प्राधिकरण, निगडी येथे ४४ गुंठे भूखंड घेऊन संस्थेने भव्य स्मृती भवन उभारले.
स्मृती भवन प्रकल्पउद्दिष्टे
समितीचे ध्येय
प्रेरणा
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची प्रेरणा व स्फूर्ती भावी पिढीतील युवकांना मिळावी.
शिक्षण
स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, ग्रंथालये, वसतिगृह व मार्गदर्शन केंद्रातून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे.
समाजसेवा
सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ देणे.
पदाधिकारी
संपर्क पदाधिकारी
अध्यक्ष, पदाधिकारी व सर्व कार्यकारिणी सदस्य.
कृतज्ञता
स्मृती भवन उभारणीतील मोलाचे योगदान
स्व. आ. लक्ष्मणभाऊ जगताप
स्मृती भवन उभारण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहावे म्हणून स्मृती भवनात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
आ. महेशदादा लांडगे
स्मृती भवन उभारण्यामध्ये भरघोस मदत केली. त्यांचे हे कार्य स्मरणात राहावे म्हणून त्यांच्या आई स्व. हिराबाई किसनराव लांडगे यांचे नाव विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रास दिले आहे.
स्व. अरुण किर्लोस्कर
फ्लिटगार्ड ग्रुप ऑफ कं. तर्फे औद्योगिक क्षेत्रात तसेच भारत विद्यालय, शहाबाग, ता. वाई या संस्थेतर्फे हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले. त्यांचे नाव स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला देण्यात आले आहे.
स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले
छ. शिवरायांचे वंशज. अजिंक्यतारा सह. साखर कारखाना व अजिंक्य समूह स्थापन करून हजारो लोकांना रोजगार दिला. त्यांचे नाव इतिहासाच्या ग्रंथालयाला देण्यात आले आहे.
सहभाग आणि सहकार्य
आमच्यासोबत असलेली मंडळे
- पुणे जिल्हा मित्र मंडळ
- सातारा जिल्हा मित्र मंडळ
- कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ
- सांगली जिल्हा मित्र मंडळ
- सोलापूर जिल्हा मित्र मंडळ
- पश्चिम महाराष्ट्र युवा मंच
समितीच्या कार्यात सहभागी व्हा
समितीने हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन आमच्या कार्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.