इतिहासाचे ग्रंथालय व वाचनालय
स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले इतिहास ग्रंथालय
महाराष्ट्राच्या इतिहासावरील ग्रंथसंपदा आणि मराठा इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचे चित्र दालन.
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून स्मृती भवनात इतिहासाचे स्वतंत्र ग्रंथालय व वाचनालय उभारण्यात आले आहे.
छ. शिवरायांचे वंशज, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व अजिंक्य समूहाचे संस्थापक आणि हजारो लोकांना रोजगार देणारे स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांचे नाव या ग्रंथालयाला देण्यात आले आहे.
वैशिष्ट्ये
येथे काय मिळते?
- महाराष्ट्राच्या इतिहासावरील मराठी पुस्तके
- छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
- मराठा इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांचे दालन
- पारंपरिक लाकडी फर्निचर असलेला वाचन कक्ष
- इतिहास अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी संदर्भ साहित्य
फोटो
झलक
प्रश्नोत्तरे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
इतिहास ग्रंथालय कुठे आहे?
हे ग्रंथालय निगडी प्राधिकरण येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवनात आहे.
ग्रंथालयात कोणती पुस्तके आहेत?
येथे महाराष्ट्र व मराठा इतिहासावरील मराठी पुस्तके व संदर्भ साहित्य उपलब्ध आहे.
ग्रंथालयाचे सभासद कसे व्हावे?
सभासदत्व व वेळांबद्दल माहितीसाठी या पानावरील फॉर्म भरा किंवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क करा.
संपर्क
अधिक माहितीसाठी संपर्क करा
वेळा, शुल्क व प्रवेश प्रक्रियेबद्दल माहितीसाठी फॉर्म भरा किंवा थेट फोन करा.
- श्री. सुनिल जाधव - ९७६३३१२४४७
- श्री. रामभाऊ तावरे - ९६६५५०१५०१
- श्री. विलास भोसले - ९८६०४९०८६७
इतर सुविधा


